बहिणीला भेटून जाणाऱ्या भावाची ठरली अखेरची भेट
पिकअप च्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर
प्रमोद झरकर/ उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:- बहिणीला भेटून जाणाऱ्या भावाची अखेरची भेट ठरल्याची पोलीस स्टेशन अंतर्गत कन्नाळगाव जवळ पिकअप वाहनाने दुचाकीस्वार याला जबरदस्त धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना काल दि २५ डिसेंबर ला सायंकाळी तिन ते चार वाजताचे सुमारास घडली.
मृतकाचे नाव रवी गुरुदास मडावी वय २७ रा. मलकापूर व गंभीर जखमी नितेश गोपिचंद शिडाम हे दुचाकी नंबर एम एच ३३ ई एल ७०३४ ने रवी मडावीच्या बहिणीला भेटायला
जामगीरी येथे गेले होते व भेटभलाई करुण मलकापूर कडे जाताना कन्नाळगाव जवळ समोरुन येणाऱ्या पिकअप क्रमांक एम एच ४० बि एल १२२३ ने जबरदस्त धडक दिली
त्यामध्ये रवी जागीच ठार झाला तर नितेश गंभीर झाला लागलीच घटनेचे गांभीर्य ओळखून पिकअप चालकाने आपल्याच वाहणात त्या दोघांनाही घेऊन चामोर्शी रुग्णालयात दाखल केले तेव्हा रवीला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गंभीर जखमी नितेश याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविले
सदर अपघाताची नोंद आष्टी येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा वनकर
हे करीत असून मृतदेह चामोर्शी रुग्णालयात असल्याने पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मृतक बहीणीला भेटायला जाऊन परतीच्या प्रवासात असताना अचानक अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच मलाकापूर येथे व जामगीरी येथे शोककळा पसरली.
फॉरवर्ड करणाराही दोषी ठरविणार
नागपूर: सोशल मिडियावर समाजात असे खोटे आणि द्वेष पसरवणाऱ्यांची आता खैर नाही. जो कोणी समाजविघातक, फेक पोस्ट करेल त्याच्यावर आणि फॉरवर्ड करणाऱ्यालाही दोषी ठरवून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपुरातील प्रेस क्लब येथे आयोजित परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तंत्रज्ञानाचा चांगल्या कामासाठी उपयोग न करता वाईट कामासाठी जास्त उपयोग होताना दिसून येत आहे. आजच्या घडीला सायबर गुन्हे ही सध्याची सर्वात आव्हानात्मकबाब आहे. तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, पण काही कुप्रवृत्तीचे लोक त्याचा अयोग्य वापर करत आहेत. ते लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात, खोटे वर्णन तयार करून दोन जातींमध्ये भेदभाव निर्माण करतात, पण आता सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना सुधारण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, राज्य, विकास, शेतकरी यासहविविध प्रश्नांवर भाष्य करत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी सायबर गुन्ह्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सायबर गुन्हे हे सध्या सर्वात आव्हानात्मक आहे. झपाट्याने वाढत आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून एडिट केलेले व्हिडिओ किंवा खोटे व्हिडिओ पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशागुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे काम सुरू आहे. सध्या आम्ही सर्वांना पकडण्यास सक्षम आहोत. सोशल मीडियाचा आमच्याकडे डिजिटल फुटप्रिंट आहे. जे काही केले जात आहे, ज्याच्या अंतर्गत पोस्ट आणि फॉरवर्ड कोणीही शोधले जाऊ शकते. यासोबतच आता चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारी व्यक्तीच नाही तर ती फॉरवर्ड करणारी व्यक्तीही दोषी असेल, असेही फडणवीस म्हणाले.
🟠बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वक्तव्य केले. बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये, असेही फडणवीस म्हणाले.
आरमोरी : आरमोरी पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी खुशाल रंदये हा आपल्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू विक्रीसाठी बाळगून असल्याची गोपनीय माहिती आरमोरी पोलिसांना न मिळाली. आरमोरी पोलिसांना र माहिती मिळताच आरोपीच्या घरी
पोलिसांनी एका सुगंधित तंबाखू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून त्याच्याकडून ६९ हजार ७० रुपयांचा तंबाखू हस्तगत करून त्यास अटक केल्याची घटना २३ डिसेंम्बरला दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली. खुशाल संजय रंदये (१९) रा. राममंदिर वॉर्ड आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
धडक देऊन त्याच्या घराची तपासणी केली असता पहिल्या खोलीत १२ हजार ४०० रूपये किमतीचे ईगल हुक्का शिशा तंबाखूचे सुगंधी तंबाखू असलेले प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाचे ४० नग पॉकेट, १८ हजार ४० रूपये किमतीचे होला हुक्का शीशा तंबाखूचे प्रत्येकी २०० ग्रॅम
वजनाचे ११० नग पाकीट, २६८० रूपये किमतीचे निघाला हुक्का शीशा तंबाखूचे प्रत्येकी ४० ग्रॅम वजनाचे ४२० नग पाकीट, ११७०० रूपये किमतीचे मजा १०८ शीशा तंबाखूचे प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाचे ५० नग असा एकूण ६९०७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन कार्यालय गडचिरोली येथील कर्मचारी सुरेश तोरेम यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. कैलास गवते, सपोनि. प्रताप लामतूरे, पो. हवा. विशाल केदार, पो.अं. सुरेश तांगडे, पोअं. हंसराज धस यांनी केली.
पाच लाख रुपयांची मोहफुल दारू व सडवा केला नष्ट
आरमोरी :आरमोरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी दोन मोहफुल हातभट्टीवर धाड टाकून पाच लाख रुपयांची मोहफुल दारू व मोहफुल सडव्याची होळी करून नष्ट केल्याची कारवाई दिनांक २४ डिसेंम्बर रोजी दुपारी २ ते ५ च्या सुमारास आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील वनतलाव व कोसरी डॅम जंगल परिसरात केली. ईश्वरदास देविदास खेडकर (४०) व कैलास विठ्ठल वाढणकर (३४) दोन्ही रा. देलनवाडी ता. आरमोरी अशी फरार आरोपींची नावे आहेत.
आरमोरी तालुक्यातील मौजा देलनवाडी वनतलाव परिसरात तसेच कोसरी डॅम परिसरात मोहफुल हातभट्टी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच आरमोरी पोलीस पथक, पंच व मुक्तीपथ संघटनेचे पदाधिकारीयांनी मोहभट्टीवर धडक दिली असता ईश्वरदास खेडकर हा आरोपी देलनवाडी वन तलाव परिसरात अवैद्यरित्या मोहा दारू काढीत असल्याचे दिसून आला. पोलिसांनी ४ हजार रूपये किमतीची २० लिटर हातभट्टी मोहा दारू, २ लाख २५ हजार रूपये किमतीचे ४५ नग निळ्या रंगाचे १०० लिटर क्षमतेचे ४५०० लीटर मोहसडवा भरलेले प्लास्टिक ड्रम असा एकूण असाएकूण ०२ लाख २९ हजार रुपयांचा हातभट्टी मोहा दारू व मोहा सडवा मिळून आला. कोसरी डॅम येथील जंगल परिसरात आरोपी कैलास वाढणकर याची मोहभट्टी असल्याचे कळताच पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळविला.
या ठिकाणावरून पोलिसांनी ०२लाख ६५ हजार रुपयांचा हातभट्टी मोहा दारू व मोहा सडवा जप्त केला. दोघाही आरोपिकडूनएकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल आरमोरीपोलिसांनी घटनास्थळी नष्ट करून वापरण्यात आलेल्या सर्व मालाची, प्लास्टिक कॅनांची होळी केली. फिर्यादीचे लेखी फिर्याद वरून दोन्ही फरार आरोपीवर म. दा. का. कलम ६५ (इ) नुसार गुन्हा दाखल केला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. कैलास गवते, सपोनि. प्रताप लामतूरे, पो. हवा. विशाल केदार, पो.अं. सुरेश तांगडे, पोअं. हंसराज धस यांनी केली.
गडचिरोली : राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली केल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या सरकारने २४ डिसेंबरला काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दैने यांचा देखील समावेश आहे. दैने आठ महिन्यांपूर्वी गडचिरोलीत रुजू झाले होते. परंतु कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करून वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. अविशांत पांडा या तरुण अधिकाऱ्याच्या हाती गडचिरोलीची सूत्रे सोपविण्यात आली. या अनपेक्षित बदलामुळे राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना दैने यांना संजया मीना यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेताच फडणवीस यांनी दैने यांची तडकाफडकी केलेली बदली चर्चेचा विषय ठरत आहे. यातून फडणवीसांनी शिंदेंना शह दिल्याचीदेखील चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारणार, अशी चर्चा सुरू आहे. स्वत: फडणवीस यांनी बुधवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत तशी इच्छा असल्याचेही सांगितले. दुसरीकडे, शिंदे हे देखील गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून फडणवीस यांनी आपणच गडचिरोलीचे पालकमंत्री होणार, असे संकेत दिल्याचेही म्हटले जात आहे.
येत्या काही काळात गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनविण्याच्या हालचाली केंद्र आणि राज्य स्तरावर सुरू आहेत. अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. ही प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी वाजनदार नेत्याला पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी होती. म्हणून मुख्यमंत्री स्वतः ही जबाबदारी घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आणखी काही अधिकारी लक्ष्य
जिल्हाधिकारी दैने यांच्या कार्यकाळात निवासी जिल्हाधिकारी कार्यालय, खणीकर्म विभाग आणि नियोजन विभाग चर्चेत होते. या विभागात सुरू असलेल्या गोंधळाची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना यावर नियंत्रण मिळविता आले नाही. या विभागतील काही अधिकाऱ्यांनी वाळू माफिया, कंत्राटदारांना हाताशी घेत अवैध कामांना मंजुरी दिल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. या सर्व बाबी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी होऊ शकते.
नागपूर : चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लब यांच्यातर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते एका प्रश्नावर बोलत होते.
पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार
सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञानाचा जर चांगला उपयोग आहे. तसेच काही नालायक, दृष्ट लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करीत आहेत. राज्यात सायबर जागरूकता अभियान सुरू केले जाणार आहे. आपण ‘सायबर सिक्युरिटी प्लॅटफार्म’ तयार केला आहे, असेही ते म्हणाले. मी सभागृहात नक्षलवाद्यांविषयी बोललो. पण, ते वगळून केवळ संविधानाला मानत नाही. एवढी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. पण, मी सांगू इच्छितो, अशाप्रकारची चित्रफित कोणी केली आणि ती कुणी-कुणी फॉरवर्ड केली, हे लगेच शोधून काढणे शक्य आहे. मोडतोड करून चित्रफित तयार करणारा गुन्हेगार तर आहेच. पण, ते फॉरवर्ड करणार सहआरोप होतो, असा इशाराही फडवीस यानी दिला.
भाजपचे आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यंनी मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी आहे. त्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिले, अशा पद्धतीने काम करेन. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सरकार चालावे, असे माझा कायम आग्रह राहिला आहे. त्यानुसार राज्याचा कारभार चालवण्यात येईल, असेही ते म्हणाले. राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. पण, धैर्यपूर्वक त्या आव्हानाला सामोरे गेलो. मी सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ दिली नाही. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे, असे मी मानतो, असेही म्हणाले.
राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर : बारावीत असलेल्या विद्यार्थिनीचे वस्तीत राहणाऱ्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. बारावीची परीक्षा झाल्यावर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्याही वारंवार भेटी-गाठी होत होत्या. त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण कुणालाही लागली नव्हती. सर्व सुरळीत सुरु असतानाच मुलीच्या ‘इंस्टाग्राम’वर प्रियकरासोबतचे बरेच व्हिडिओ तिच्या भावाला दिसले. त्याने आईवडिलांशी चर्चा केली आणि थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोनम (बदललेले नाव) ही आईवडिल आणि भावासह कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती बारावीची विद्यार्थिनी आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिची आरोपी प्रतिकसोबत ओळख झाली. प्रतिकसुद्धा कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.
तो बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. दोघांचेही कॉलेज एकाच रस्त्यावर असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांना नेहमी मदत करायचे. प्रतिक हा शिक्षणासह एका खासगी कंपनीत कामाला जात होता. त्यामुळे तो तिला शिक्षणासाठीसुद्धा मदत करीत होता. दोघांच्या मैत्री पुढे वाढली. दोघांच्याही भेटी व्हायला लागल्या. त्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला सोनमला प्रेमाची मागणी घातली. प्रतिकच्या प्रेमाला तिनेही साद दिली.
दोघांचेही प्रेमसंबंध वाढले. मार्च महिन्यात त्याने सोनमला ‘सरप्राईज पार्टी’ असल्याचे सांगून फिरायला नेले. एका ढाब्यावर तिच्यासोबत जेवण केल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे प्रतिकने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने अनेकदा तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघांचे प्रेम चांगलेच फुलले.
भावाने व्हिडीओ बघितला
प्रतिक आणि सोनम हे दोघेही वस्तीपासून दूर जाऊन एकमेकांच्या भेटी घ्यायला लागले. सोनमसुद्धा प्रतिकच्या प्रेमात वेडी झाली. तिने प्रियकरासोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर बरेच व्हिडिओ आणि फोटो काढले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने प्रतिकसोबत एका बगिच्यात फिरत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. त्यात प्रेमाचे गीतसुद्धा घातले. गेल्या दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरील व्हिडिओ तिच्या भावाने बघितला. त्याने बहिणीचे प्रेमप्रकरण आईवडिलांना सांगितले.
कुटुंबियांनी तिला विचारणा केली असता तिने प्रतिकसोबत प्रेम असून आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. तसेच शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे चिडलेल्या कुुटुंबीयांनी तिला कपीलनगर पोलीस ठाण्यात नेले. लेखी तक्रारीवरुन पोलिसांनी सोनमच्या प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. कपीलनगर पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीवरुन प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. प्रतिक शैलेंद्र वक्ते (२३, रा, कपीलनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
गडचिरोली.
गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाचे सहसचिव, अंनिसचे कार्यकर्ते, झाडीबोली कवी श्री. उपेंद्र रोहनकर, ह्यांच्या "डोरे रावून अंद्रा" कवितेला नुकताच पहिला (५000/-रु. रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र) राष्ट्रीय मराठी बोलीभाषा पुरस्कार जाहीर झाला आहे. सातारा येथील कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २0२४ मध्ये राष्ट्रीय मराठी, कोकणी बोलीभाषेतील काव्यालेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेत महाराष्टात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषा आणि त्यात लेखन करणारे अनेक कवी आपल्या कविता पाठवून सहभागी झाले होते.मराठी बोली भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन असलेली ही देशातील पहिली स्पर्धा होती.दुसरा क्रमांक लांजा येथील कवियत्री मराठीच्या अभ्यासक विजयालक्ष्मी देवगोजे यांच्या बेळगावी बोलीतील "सासुरवाशीन " कवितेला ( ४000/-रु. रोख सन्मानचिन्ह वं प्रमाणपत्र )तर तिसरा क्रमांक अनिता नंदू बर्गे ह्यांच्या कोकणी बोलीतील "जिनेचे एक पुस्तक" ह्या कवितेला(३000/- रु. रोख सन्मानचिन्ह वं प्रमाणपत्र ) मिळाला आहे.शिवाय दहा उतेजनार्थ बक्षीसमध्ये चंद्रपर जिल्ह्यातील आमडीचे कवी प्रशांत भंडारे ह्यांच्या झाडीबोतील "रोवना" व सुनील बावणे यांच्या "लाव बेकणी" ह्या कवितांचा समावेश आहे.
उपेंद्र रोहनकर हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आताच्या सावली तालुक्यातील करगांव चक ह्या गावचे.खेड्यात राहून त्यांनी प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर तालुक्याच्या मूल ह्या गावी हायस्कुल पर्यंतचे शिक्षण घेतले. तेव्हा त्यांना आपल्या बोलीशी सामना करावा लागायचा.बोलीतील शब्दांना शहरातील लोक हसायचे. खाल्लू, घेतलू, आलू, गेलू, नेहमीची भाषा हळूहळू विसरत गेली. जसे संस्कार तशी वागणूक. पण मुलगी जशी आपल्या माहेरला विसरू शकत नाही. तसे संस्कार देणारी आपली माती आपण विसरत नाही. अलीकडे त्यांचा " डोळस व्हायचं" हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.त्यात त्यांच्या काही बोलीतील कविता आहेत.
गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हा प्रामुख्याने झाडीचा प्रदेश आहे. ह्या भागात झाडीबोली बोलली जाते.इथल्या संस्कृती, कला, नाटक,साहित्यात ही बोली बघायला मिळते. आता केंद्रशासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे हळूहळू विलोपास जात असलेल्या बोलीभाषा आता पुन्हा सक्षमपणे बोलल्या, लिहल्या जातील.बोली टिकल्या तर भाषा टिकतील.आता त्या त्या भागात राहणाऱ्या कवी लेखकांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सदर पुरस्काराबद्दल कवी उपेंद्र रोहनकर ह्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, झाडीबोलीचे अभ्यासक तथा जेष्ठ साहित्यिक डॉ.हरीशचंद्र बोरकर,झाडीबोलीच्या कवियत्री अंजनाबाई खुणे, केंद्रीय झाडीबोली साहित्य मंडळाचे सदस्य , ग्रामगितचार्य बंडोपंत बोढेकर, ३२ व्या झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष मा. लोकराम शेंडे,गडचिरोली झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर, सल्लागार डॉ. चंद्रकांत लेनगुरे, उपाध्यक्ष डॉ.प्रवीण किलनाके, सचीव संजीव बोरकर, चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री.अरुण झगडकर,झाडीबोली कवी लक्ष्मण खोब्रागडे. गोंडपिपरी,वरोरा, ब्रम्हपुरी, बल्लारपूर, सिंदेवाही, मंडळातील कविनी शुभेच्छा दिल्या.तसेच
महाअनिसचे विलास निंबोरकर, सायकलस्नेही मंडळाचे प्रा. विलास पारखी, सर्वोदय मंडळाचे प्रा. देवानंद कामडी, गुरुदेव सेवामंडळाचे डॉ. कुंभारे, पत्रकार रोहिदास राऊत, मिलिंद उमरे तसेच विविध संघटना, साहित्य समूहानी अभिनंदन केले आहे.
युवा संकल्प ने गढ़चिरौली जिला कृषि अधीक्षक से पीएमकिसान ऑनलाइन दस्तावेज़ अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाने की मांग की।
गढ़चिरौली : पी.एम. किसान योजना के तहत कई नागरिकों ने अपना ऑनलाइन पंजीकरण कराया है। चूंकि पार्टू ऑनलाइन डॉक्यूमेंट में पीडीएफ को 200 केबी में अपलोड करना है। इस बिंदु पर दस्तावेज़ स्पष्ट रूप से दिखाई नहीं दे रहा है. इतने सारे नागरिकों के फॉर्म रद्द कर दिए गए हैं. और ऑफिस में उन्हें अक्सर भागदौड़ करनी पड़ती है। दस्तावेज़ अपलोड की अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए। 2KB में परिवर्तन रजिस्टर एवं पति-पत्नी का आधार कार्ड एवं 16 वर्ष से कम उम्र के बच्चे का आधार कार्ड अपर्याप्त दस्तावेज हैं। सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए, इसके लिए उप निदेशक श्री सतीश पवार साहब से अनुरोध किया गया था, जिसमें राहुल भांडेकर, महेंद्र लठारे, रमेश कोठारे, तेजस कोंडेकर, राहुल वैरागड़े और अन्य उपस्थित थे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला :-डी. के. साखरे
मंगळवेढा :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी मंगळवेढा येथील श्री. संत चोखामेळा चौकात मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी साखरे बोलत होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा शहराध्यक्ष अजय गाडे व बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम भीम सैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी शेवडे यांच्या हस्ते श्री. संत चोखामेळा यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.पुढे बोलताना साखरे म्हणाले की, ज्या मनुस्मृतीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, विषमतेचा पुरस्कार केला तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले त्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी दहन केले. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण भारतात मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेविरुद्ध पुकारलेले बंड असून जिवंत आंबेडकरांपेक्षा आज प्रस्थापित मेलेल्या आंबेडकरांनाचं जास्त घाबरतात.तर वंचित बहुजन आघाडीचे अजय गाडे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला जगात तोड नसून मनुवादी प्रवृतीचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे.यावेळी विजय शिकतोडे, समाधान भोसले, सुनिल शेंबडे, ब्रम्हदेव वाघमारे,संदेश लोखंडे,विकास जावळे,नितीन लोकरे, श्रीपती लोकरे, नितीन शेंबडे, नंदू लांडगे,बाबा घनवजिर यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल देत पुन्हा एकदा बहुमताचा सरकार अस्तित्वात आणल्या गेल्या आणि जनतेच्याही मनात तेच होतं.अगदी लाडक्या बहिणी सहित.मंत्रिमंडळाचा गटन होऊन प्रत्येक मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांना आपापल्या पदाची जबाबदारी देखील देण्यात आली.
आता महायुतीमध्ये सर्व काही ऑल वेल आहे,असं चित्र होतं परंतु माशी शिंकली ती पालकमंत्री पदावर. महायुतीमध्ये आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झालेली पाहायला मिळतो आहे आणि यातच महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आप आपला हेकेपणा सोडायला तयार नाहीत.माझ्या पक्षाला अमुक अमुक पालकमंत्री पद मिळालेच पाहिजे हा हेका जोवर सुटत नाही तोवर महायुतीमध्ये सर्व काही ऑल वेल आहे असं म्हणता येणार नाही.
कारण या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांना पाण्याखाली पाहताना दिसतो आहे.महायुतीमध्ये दुसरे बेत मतभेद म्हणजे मंत्रि महोदयांना जे काही बंगले मिळाली आहेत,त्यावर सुद्धा काही नेत्यांची नाराजी दिसून येतो आहे.
महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असणारे घटक पक्ष माननीय एकनाथ शिंदेची शिवसेना आणि माननीय अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सरळ सरळ भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर आरोप आहे की बंगले वाटताना आम्हाला विश्वासात घेतल्या गेलं नाही आणि आम्हा दोन्ही घटक पक्षांना बंगले न देता फ्लॅट देण्यात आले.
महायुतीमध्ये जो काही रस्सीखेचपणा सुरू आहे त्यावर तिन्ही पक्षांनी पक्षातील नेत्यांनी एकत्र बसून किंवा विश्वासात घेऊन त्या निर्णयाची अमलबजावणी करायला पाहिजे.ज्या जनतेने तुमच्या हातात सध्या सत्तेची चाबी दिली,राज्यावर राज्य करायला संधी दिली त्यावर विचार मंथन व्हायला पाहिजे.या रस्सीखेचच्या खेळात तुम्ही मजबूर होऊन जाहल आणि राज्यातील जनता मात्र वाऱ्यावर राहून जाईल.राज्यातील नेते मंडळी खातात तुपाशी आणि भोळी भाबडी जनता राहील उपाशी असं व्हायला नको
Latest Isro Mission: इसरो 30 दिसंबर को अपना नया मिशन, स्पेस डॉकिंग एक्सपेरीमेंट (स्पाडेक्स), लॉन्च करने जा रहा है। इस लॉन्च के साथ ही भारत अंतरिक्ष कार्यक्रम में एक अहम कदम बढ़ाएगा और दुनिया के उन तीन देशों के क्लब में शामिल हो जाएगा, जिनके पास दो अंतरिक्ष यानों या उपग्रहों की डॉकिंग करने की क्षमता है। फिलहाल, अमेरिका, रूस और चीन इस विशेष क्षमता के मालिक हैं। इस मिशन के बाद भारत का नाम भी इन देशों के साथ लिया जाएगा।
यह मिशन, जो ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलवी-सी60) द्वारा श्रीहरिकोटा के सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से लॉन्च किया जाएगा, इसरो का 2024 का आखिरी मिशन होगा। इसके सफल संचालन से भारत की भूमिका वैश्विक अंतरिक्ष समुदाय में और भी सशक्त हो जाएगी। यह मिशन रिसर्च और अंतरराष्ट्रीय सहयोग के नए द्वार खोलेगा, और अंतरिक्ष में डॉकिंग क्षमताओं का प्रदर्शन करेगा, जो भविष्य के अंतरिक्ष प्रयासों के लिए अत्यंत महत्वपूर्ण है।
इस मिशन का मुख्य उद्देश्य दो अंतरिक्ष यानों के बीच डॉकिंग और अनडॉकिंग के लिए आवश्यक प्रणालियों का परीक्षण करना है। अंतरिक्ष में डॉकिंग एक जटिल और जोखिमपूर्ण प्रक्रिया होती है, जिसमें बहुत ही सटीकता की आवश्यकता होती है। एक छोटी सी चूक भी दुर्घटना का कारण बन सकती है। इस मिशन के तहत, दो अंतरिक्ष यान—चेजर (एसडीएक्स01) और टारगेट (एसडीएक्स02)—की डॉकिंग की जाएगी। इन दोनों यानों का वजन लगभग 220 किलोग्राम होगा। मिशन का उद्देश्य ये सुनिश्चित करना है कि चेजर यान, टारगेट यान का पीछा कर उसे डॉक कर सके।
इसरो के वैज्ञानिकों द्वारा मिशन कंट्रोल से चेसर और टारगेट के बीच की दूरी को सटीकता से नियंत्रित किया जाएगा। दोनों यान पृथ्वी की निचली कक्षा (LEO) में 470 किलोमीटर की ऊंचाई पर स्थापित होंगे और चेजर, टारगेट के पास आते हुए अंततः 3 मीटर की दूरी पर डॉक करेंगे। इस प्रक्रिया के दौरान, अंतरिक्ष यान के बीच इलेक्ट्रिक पावर का ट्रांसफर भी किया जाएगा।
इस मिशन का सफलतापूर्वक संपन्न होना भारत के अंतरिक्ष विज्ञान में एक मील का पत्थर साबित होगा और देश को अंतरिक्ष तकनीकी में प्रमुख खिलाड़ियों में शामिल करेगा।
Success Story: स्वाति भार्गव Swati Bhargava ने हरियाणा के छोटे से शहर अंबाला से निकलकर अपने सपनों को साकार किया और 300 करोड़ रुपये का बिजनेस खड़ा कर सफलता की मिसाल कायम की है। स्वाति ने गोल्डमैन सैक्स जैसी प्रतिष्ठित कंपनी की नौकरी छोड़कर अपना स्टार्टअप शुरू किया, जिसे आज देशभर में पहचाना जाता है। उनके स्टार्टअप कैशकरो (CashKaro) को न केवल ग्राहकों का भरपूर समर्थन मिला, बल्कि उद्योगपति रतन टाटा का भी विश्वास हासिल हुआ। वित्तीय वर्ष 2023-24 में इस प्लेटफॉर्म ने 300 करोड़ रुपये का राजस्व अर्जित किया, और अब यह 500 करोड़ रुपये के लक्ष्य की ओर बढ़ रहा है।
स्वाति का सफर अंबाला से शुरू हुआ। बचपन से ही पढ़ाई में उत्कृष्ट स्वाति को सिंगापुर में 11वीं और 12वीं कक्षा पूरी करने के लिए स्कॉलरशिप मिली। इसके बाद उन्होंने लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स (LSE) में पढ़ाई की। एलएसई से स्नातक होने के बाद, स्वाति ने गोल्डमैन सैक्स में इन्वेस्टमेंट बैंकिंग में नौकरी शुरू की और पांच साल तक वहां काम किया। हालांकि, उनकी महत्वाकांक्षाएं केवल नौकरी तक सीमित नहीं थीं।
स्वाति और उनके पति रोहन भार्गव को CashKaro का विचार हनीमून के दौरान आया। ब्रिटेन में उन्होंने Quidco नाम की एक कैशबैक साइट का उपयोग किया और 10,000 रुपये का कैशबैक पाया। इसी अनुभव ने उन्हें भारत में ऐसा ही एक प्लेटफॉर्म शुरू करने की प्रेरणा दी। 2013 में दोनों ने भारत में कैशकरो की शुरुआत की, जो ग्राहकों को ऑनलाइन खरीदारी पर कैशबैक और कूपन की सुविधा प्रदान करता है।
CashKaro को बड़ा अवसर तब मिला जब रतन टाटा ने इस स्टार्टअप में निवेश किया। स्वाति ने मुंबई के ताज होटल में टाटा को अपना आइडिया प्रेजेंट किया। टाटा ने इसे सराहा और कहा, "एक ऐसे देश में जो पैसे बचाने को प्राथमिकता देता है, आप मुफ्त पैसे दे रहे हैं। इसमें पसंद न करने जैसा क्या है?" टाटा के निवेश से कैशकरो को नई पहचान और मजबूती मिली।
2023-24 तक, कैशकरो ने 300 करोड़ रुपये का राजस्व अर्जित किया। स्वाति का लक्ष्य इसे 500 करोड़ रुपये तक पहुंचाने का है। इसके अलावा, कंपनी जल्द ही आईपीओ लाने की तैयारी में है।
स्वाति भार्गव की कहानी न केवल प्रेरणादायक है, बल्कि यह दिखाती है कि छोटे शहरों से निकलकर भी बड़ी उपलब्धियां हासिल की जा सकती हैं। उनका सफर मेहनत, दूरदृष्टि और सही फैसलों का एक उदाहरण है। आज कैशकरो एक बड़ा ब्रांड बन चुका है, और यह स्वाति की मेहनत और दृढ़ संकल्प का परिणाम है।
Devendra Fadnavis Edited Video : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ एडिट करून ते संविधान विरोधी असल्याचं त्यात दाखवण्यात आलं आहे. या घटनेप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Devendra Fadnavis Edited Video : लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडवर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून संपूर्ण देशात गदारोळ सुरू असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही जणांनी त्यांचा व्हिडिओ एडिट करून ते संविधान विरोधात असल्याचं दाखवलं आहे. याची गंभीर दाखल पोलिसांनी घेतली असून या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाविरोधात काँग्रेसनं अनेक ठिकाणी निषेध मोर्चे व आंदोलनं केली. यावरून भाजप अडचणीत सापडली असतांना आता सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, भारत शिंदे, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवाळे, प्रसाद साळवी, सुरेश काळे, वरद कांकी, अमोल कांबळे, सैयद सलीम, द स्मार्ट २३०के, विष्णू भोटकर अशा व्यक्ती आणि सोशल मीडिया हँडलविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी घेतली दखल
या व्हायरल व्हिडिओची सायबर पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी १२ जणांवर व त्यांच्या सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ हा अर्धवट एडिट करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आणखी काही जणांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच तंत्रीक विश्लेषण करून ट्विटर, फेसबूक व इन्स्टाग्राम व यूट्यूबला देखील या व्हायरल व्हिडिओची माहिती देऊन तो काढून टाकण्यात यावा या बाबत सांगण्यात आलं आहे.
Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता१५ हजार रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी दिली.
शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तितकीच अर्थात सहा हजार रुपये दिले जातात. दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.'
‘शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे, तसेच रसायनांचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडावे, यासाठी गट शेती, अवजारांची बँक, शाश्वत सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी अग्री बिझनेस सोसायटी आदी योजना-उपक्रम राबविण्यात येत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
आष्टी : चामोर्शी तहसीलच्या आष्टी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वसंतपूर फार्म कॉम्प्लेक्सच्या जंगलात प्राण्यांच्या दीपक सरकार शिकारीसाठी वन्य टाकलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने वसंतपूर येथील युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे. ही घटना २३ डिसेंबरला घडली. मृत व जखमी तरुण मोहाची दारु गाळण्यासाठी जात होते, अशी माहिती समोर आली आहे.
दीपक दिलीप सरकार (२१) असे मृत युवकाचे नाव आहे. आकाश आशुतोश मिस्त्री (१७) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वसंतपूर गावातील काही अज्ञात आरोपींनी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी सोमवारी रात्री शेतसंकुलाच्या जंगलात विद्युत तारा टाकल्या होत्या. दरम्यान, रात्री दीपक आणि आकाश हे दुचाकीवर बसून जंगलातील हातभट्टीवर मोहाची दारू पोहोचवायला जात होते. दरम्यान, शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. आकाश गंभीर जखमी झाला. घटनास्थळी शिकार केलेले रानडुकर आढळून आल्याची माहिती आहे.
अज्ञातावर गुन्हा
या प्रकरणी निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात आरोपीवर आष्ठी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही. तपास सुरू असल्याचे पो.नि. विशाल काळे यांनी सागितले.
तक्रार झाल्यास जेलची हवा, तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नका
गडचिरोली : आपण सोशल मीडियावर सक्रीयअसाल, तर सावधान ! आपण कोणतीही पोस्ट करताना खात्रीपूर्वक करा, अन्यथा एखादी चुकीची पोस्ट केलात, तरआपल्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. परिणामी आपल्याला जेलची हवा सुद्धा खावी लागेल.
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्टिटर, टेलिग्राम अशा विविध सोशल मीडियावर चर्चा करताना किंवा कोणतीही पोस्ट टाकताना पोस्ट आपत्तीजनक तर नाही ना. याचा विचार करूनच ती पोस्ट टाका. अन्यथा आपण टाकलेल्या पोस्टवर कुणी आपत्ती दर्शविल्यास आपल्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. परिणाम स्वरूप त्यापोस्टवरून चिघळलेल्या वादाचे गांभीर्य पाहून आपल्याला तुरुंगाची हवा देखील खावी लागू शकते. सामाजिक तेढ निर्णाण होणार नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
🟠सोशल मीडियाचा वापर सांभाळून करा
सोशल मीडियावरून आपत्तीजनक पोस्ट केल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याला अटक करून तुरुंगाची हवा देखील खावी लागू शकते. कुणी आपत्तीजनक पोस्ट केली, तर त्याला समर्थन देऊ नका, त्यावर कॉमेंट करून तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नका.
🟠मुलींनो डीपी सांभाळा
मुलींनो आपण सोशल मीडियावर सक्रीय असाल, तर आपण आपलीही काळजी घ्या. आपल्या डीपीवर : समाजकंटकांचे डोळे आहेत. समाजकंटक मुलींच्या डीपी चोरून त्या फोटोंचा वापर चुकीच्या कामासाठी करतात. अश्लील फोटो किवा व्हिडीओच्या ठिकाणी त्या फोटोचा वापर करू शकतात. अनोळखी व्यक्तीला फॉलो करू नका, आपल्याला संशय आल्यास त्या व्यक्तीला ब्लॉक करा.
🟠अशी घ्या काळजी
सोशल मीडियावरून आपत्तीजनक पोस्ट करू नये, कोणतीही पोस्ट करताना तिची खात्री करूनच पोस्ट करावे. अश्लील फोटो, आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ टाकू नये, सामाजिक तेढ़ निर्माण होईल आणि समाजाची शांतता भंग होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. कुठलीही पोस्ट आली आणि आपण त्या पोस्टला समजून न घेता सरळ तिला फॉरवर्ड करू नये, अन्यथा आपण त्यातही गुन्हेगार ठरू शकतो.
वसंतपूरजवळील रेंगेवाही बिटातील घटना
चामोर्शी/आष्टी, (वा.). तालुक्यातील आष्टीजवळील वसंतपूरपासून एक किमी अंतरावरील रेंगेवाही बिटांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात अज्ञातानी शिकारीसाठी लावलेल्या जिवंत विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यूसह याच घटनास्थळी रानडुक्कर मृतावस्थेत आढळला. तर एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा जखमी झाल्याची घटना उघडकीस आल्याने प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
आष्टी परिसरातील वसंतपूरपासून 1 किमी अंतरावर रेंगेवाही बिटाअंतर्गत जंगल परिसरात सोमवारी (दि. 23) रात्री अज्ञातांनी शिकारीसाठी जिवंत विद्युत तार सोडून ठेवले होते. दरम्यान, रात्री 8.30 वाजता विद्युत लाइन ट्रीप होऊन पाच मिनिटातच विद्युतसेवा पूर्ववत झाली. या कालावधीत रेंगेवाही परिसरात विजेचा शॉक लागल्याने काही इसमांना दुखापत झाल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिस, वनविभाग व महावितरण पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आष्टी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या वसंतपूर येथील दीपक दिलीप सरकार (22) याचा मंगळवारी (दि. 24) सकाळी 10 वाजताच्या सुमारास विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर याच कालावधीत वसंतपूर येथील आकाश मिस्त्री जखमी झाला. तसेच रानडुक्करही मृतावस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये तरुणाच्या मृत्यूबाबतही तर्कवितर्क लावले जात आहे. तरुणाचा मृत्यू वीजतारेच्या स्पर्शाने झाल्याच संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टीच्या पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला
गडचिरोली : पैशांच्या कारणावरून वृध्द आईला पोटच्या लेकराने हाताबुक्क्याने मारहाण केली. ही घटना २२ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता शहरातील तेली मोहल्ला भागात घडली. गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मूळच्या जांभळी (ता. गडचिरोली) येथील सुमनबाई सखाराम चांभारे (७०) या तेली मोहल्ला येथे राहतात तर त्यांचा मुलगा दीपक हा पत्नी मायासमवेत वेगळा राहतो. सुमनबाई या २२ रोजी दुपारी नातीच्या घरी होत्या. दीपक चांभारे हा दारूच्या नशेत तेथे आला. त्याने तू माझे पैसे का बुडविले, असे म्हणत सुमनबाई यांच्याशी वाद घालून मारहाण केली. नात व तिचा पती वाद सोडविण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ केली.
आरमोरी. येथील शिवाजी चौकातील रहिवासी किरण मनोहर दुमाने याला 8 दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 23) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. किरण आठ दिवसांपूर्वी मासेमारीसाठी नदीवर गेला होता. यावेळी त्याच्या पायाला एका विषारी सापाने दंश केला. परंतु त्याला चावा घेतल्याचे जाणवले नाही. त्यानंतर काही वेळाने तो आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला.
तेव्हा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला गडचिरोली येथील दवाखान्यात पुढील उपचार घेण्यासाठी सांगितले. परंतु तो भरती न होता थेट घरी परतला. आठ दिवसांनंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला सोमवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता पुन्हा आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले